प्रसिद्ध चित्रपट निर्माते अरिबाम श्याम (Aribam Syam Sharma) यांनी आपला पद्मश्री पुरस्कार (Padma Shri) सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक (Citizenship Amendment Bill) मुद्द्यावर अरिबाम श्याम आक्रमक झाले आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016 च्या विरोधात आक्रमक होत अरिबाम श्याम यांनी ही घोषणा केली आहे. मणिपुरी चित्रपट निर्माता (Manipuri Filmmaker) असलेलेल अरिबाम श्याम यांना हा पुरस्कार 2006 मध्ये मिळाला होता. अरिबाम श्याम हे 83 वर्षांचे असून, त्यांच्या अनेक चित्रपट आणि अल्बमला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. देशात पुन्हा एकदा 'पुरस्कार वपसी' मोहीम जोर पकडण्याची शक्यता आहे. या आधी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर 'पुरस्कार वापसी' मोहीम कार्यरत झाली होती.
अरिबाम श्याम शर्मा यांनी 'इशानौ', 'संगाई- द डांसर डियर', 'इमगी निंग्थम' यांसारखे अनेक चित्रपट बनवले आहेत. श्याम यांनी 'पुरस्कार वापसी'बाबत घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद चित्रपट, संगीत आणि कला क्षेत्रात उमटताना दिसत आहेत. 30 ऑगस्ट 2015 मध्ये कर्नाटकमधील प्रसिद्ध लेखक एम. एमच कलबुर्गी यांची हत्या झाली. महाराष्ट्रातही नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली. या हत्येचे तीव्र पडसाद कला, लेखन क्षेत्रात उमटले. या हत्यांच्या निशेधार्थ सुमारे 40 कलाकारांनी आणि लेखकांनी सरकारद्वारे मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले होते. (हेही वाचा, मागण्या मान्य न झाल्यास 'पद्मभूषण' पुरस्कार परत करणार - अण्णा हजारे, उपोषणावर अण्णा ठाम)
दरम्यान, महाराष्ट्रातून समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आपल्याला मिळालेला 'पद्मभूषण' पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे. अण्णा हजारे यांनी लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीची मागणी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा अशा मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोष सुरु आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी अण्णा हजारे यांच्यासोबत केलेली शिष्टाई यशस्वी ठरली नाही. अण्णा उपोषणावर ठाम आहेत. तसेच, मागण्या पूर्ण झाल्यान नाहीत तर, सरकारद्वारे मिळालेला 'पद्मभूषण' पुरस्कारते येत्या 8/9 जानेवारीला सरकारला परत करणार आहेत.