NDA-INDIA Bloc Clash: आज सभागृहाच्या प्रवेशाच्या पायरीवर विरोधी पक्ष आणि एनडीएच्या खासदारांमध्ये झालेल्या बाचाबाचीप्रकरणी अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि बन्सुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांच्यासह एनडीएचे तीन खासदार तक्रार देण्यासाठी संसद मार्ग पोलिस ठाण्यात (Parliament Street Police Station) पोहोचले आहेत. याप्रकरणी अनुराग ठाकूर यांनी भाजपच्या इतर खासदारासोबत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अपमानावरून संसदेच्या आवारात विरोधी पक्ष आणि एनडीएच्या खासदारांमध्ये झालेल्या बाचाबाचीत माजी मंत्री प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले. भाजपने राहुल गांधींवर ( Rahul Gandhi) ज्येष्ठ सदस्याला धक्का देण्याचा आरोप केला. तथापी, काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे.
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे की, 'त्यांना कायद्याचे उल्लंघन करण्याची सवय आहे. त्यांच्या हाणामारीत दोन खासदार पडले. खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीएनएस कलम 109 अन्वये तक्रार देण्यात आली आहे. या घटनेनंतरही राहुल गांधींचा अहंकार मोडला नाही आणि ते खासदारांना न भेटताच निघून गेले. राहुल गांधी स्वतःला कायद्यापेक्षा वरचे समजतात.' (हेही वाचा - Rahul Gandhi pushed an MP? राहुल गांधी यांनी दिलेल्या धक्क्यमुळे डोक्याला दुखापत, भाजप खासदार प्रताप सारंगी यांचा आरोप; काँग्रेसकडून प्रत्युत्तर)
VIDEO | Delhi: BJP legal team along with party MPs Anurag Thakur (@ianuragthakur), Bansuri Swaraj (@BansuriSwaraj), and others reach Parliament Street police station to file a complaint against Congress MP and Lok Sabha LoP Rahul Gandhi.
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/diEA4BDZNs
— Press Trust of India (@PTI_News) December 19, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली जखमी खासदारांची चौकशी -
भाजप खासदार मुकेश राजपूत हे देखील या झटापटीत जखमी झाले आहे. यासंदर्भात कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सारंगी आणि राजपूत यांना फोन करून संसदेच्या संकुलात जखमी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (हेही वाचा -Lok Sabha Winter Session: अमित शहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप; विरोधकांवर घणाघाती टीका करत पंतप्रधान मोदींनी सांभाळली बाजू)
राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा - अमित मालवीय
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, राहुल गांधींविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवावा. कारण त्यांनी एका महिला आणि आदिवासी भाजप खासदारावर हल्ला केला. याशिवाय संसदेच्या आवारात महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करून त्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात यावा.