Conspiracy To Bomb Army Train (फोटो सौजन्य - @ndtvindia)

Conspiracy To Bomb Army Train: मध्य प्रदेशात लष्कराच्या ट्रेन (Army Train) मध्ये बॉम्बस्फोट (Bombing) घडवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ट्रेन रुळावरून घसरल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातून एक नवीन प्रकरण समोर येत आहे, ज्यात लष्कराची ट्रेन बॉम्बने उडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मध्य प्रदेशातील नेपानगर विधानसभेच्या सागफाटा भागात अज्ञात हल्लेखोरांनी डिटोनेटर (Detonator) च्या मदतीने ट्रेन उडवण्याचा कट आखला होता. प्रत्यक्षात ट्रेन डिटोनेटरवरून गेल्यानंतर चालकाला स्फोट झाल्याची जाणीव झाली आणि त्याने ट्रेन थांबवून स्टेशन मास्तरांना यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे मोठा अपघात टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी 10 डिटोनेटर्स लावून लष्कराची स्पेशल ट्रेन उडवण्याचा कट रचण्यात आला होता. याबाबतची माहिती एटीएस आणि एनआयएला मिळताच रेल्वे आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ही बाब लष्कराशी संबंधित असल्याने अधिकारी याबाबत गुप्तता पाळत आहेत. रेल्वे ट्रॅकवर 10 डिटोनेटर्स लावण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत सागफाटा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तींनी ट्रॅकवर खांब क्रमांक 537/5 आणि 537/3 मध्ये डिटोनेटर लावले होते. (हेही वाचा - Bomb Found Near CM Residence in Assam: आसाममध्ये साखळी बॉम्बस्फोटचा कट फसला! मुख्यमंत्री निवासस्थान आणि आर्मी कॅन्टोन्मेंटजवळ सापडले बॉम्ब)

ट्रेन डिटोनेटरच्या पुढे जाताच मोठा आवाज झाला आणि ट्रेन चालक सावध झाला. यानंतर त्यांनी सागफाट्यापासून काही अंतरावर ट्रेन थांबवून स्टेशन मास्टरला याबाबत माहिती दिली. लोको पायलटच्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेग आला. हे प्रकरण लष्कराच्या जवानांशी संबंधित असल्याने तपास यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. (हेही वाचा -CSMT Bomb Threat: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; फोन करणाऱ्या व्यक्तीला जीआरपीने घेतले ताब्यात, चौकशी सुरु)

मध्य प्रदेशात आर्मी स्पेशल ट्रेन उडवण्याचा प्रयत्न, पहा व्हिडिओ - 

दरम्यान, शनिवारी दुपारी पोलिस विभागाच्या विशेष शाखेचे डीएसपी, नेपानगर एसडीओपी स्टेशन प्रभारी यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शनिवारी सायंकाळी उशिरा एनआयए, एटीएससह अनेक गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रेल्वे रुळाची पाहणी केली.