Bomb Found Near CM Residence in Assam: आसाममध्ये साखळी बॉम्बस्फोटो (Chain Bombing) चा कट फसल्याचं समोर आलं आहे. गुवाहाटी (Guwahati) मध्ये शुक्रवारी दोन आयईडी (IED) सारखी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. आसाममध्ये गेल्या 24 तासांत एकूण 10 बॉम्बसदृश साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रतिबंधित संघटना उल्फा (आय) ने राज्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 24 स्फोटके पेरल्याचा दावा केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बंदी घातलेली अतिरेकी संघटना उल्फा (आय) ने राज्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी 24 स्फोटके पेरल्याचा दावा केला आहे. यातील एक उपकरण सातगाव परिसरात, नारेंगी मिलिटरी कॅन्टोन्मेंटजवळ, तर दुसरे स्फोटक मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या राज्य सचिवालय आणि मंत्री कॉलनीजवळील शेवटच्या गेटवर सापडले.
उल्फाने पाठवा मेल -
युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (स्वतंत्र) ने गुरुवारी विविध माध्यम संस्थांना ई-मेलद्वारे यादी पाठवली, ज्यामध्ये छायाचित्रांसह 19 बॉम्बची नेमकी ठिकाणे सांगण्यात आली होती. परंतु, उर्वरित पाच बॉम्बचा उल्लेख करण्यात आलेला नाही. गुरुवारी सकाळी 6 ते दुपारच्या दरम्यान स्फोट होणार होते, परंतु 'तांत्रिक बिघाडामुळे' बॉम्बचा स्फोट झाला नसल्याने स्फोट होऊ शकला नाही, असे उल्फाने म्हटले आहे. (हेही वाचा -CSMT Bomb Threat: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; फोन करणाऱ्या व्यक्तीला जीआरपीने घेतले ताब्यात, चौकशी सुरु)
दरम्यान, गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दिगंत बराह यांनी सांगितलं की, उल्फाच्या निवेदनात नमूद केलेल्या सर्व भागात आम्ही सखोल शोध घेत आहोत. काल सातगावमध्ये शोध घेण्यात आला. आज पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येत आहे. आम्ही सातगावमध्ये एक आयईडी सारखी उपकरणे आणि एक बॉम्ब जप्त केला. आणखी एक स्फोटक उपकरण सापडले आहे. दोन्ही उपकरणे गुरुवारी शहरात सापडलेल्या उपकरणांसारखीच होती. (हेही वाचा -Mumbai Hospitals Receive Bomb Threats: मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्या; व्हीपीएन नेटवर्कवरून आले ईमेल, तपास सुरु)
We request public support for information in the ongoing investigation on Bomb like devices planted by ULFA.
₹5 lakh reward will be given for concrete leads.
Details below. @DGPAssamPolice @gpsinghips @HardiSpeaks pic.twitter.com/ykqiIc3wzT
— Assam Police (@assampolice) August 16, 2024
पहा व्हिडिओ -
#WATCH | Assam: Security forces recovered a suspected Improvised Explosive Device (IED) on the road to Gandhi Mandap, in Guwahati. pic.twitter.com/wBXBymRZXy
— ANI (@ANI) August 15, 2024
काही 'स्फोटक प्रकारचे पदार्थ' उपकरणांमध्ये सापडले असले तरी ते स्फोटक होते की नाही? हे फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यानंतरच समजेल. गुरुवारी आसाममधील पोलिसांनी आठ 'बॉम्बसदृश वस्तू' जप्त केल्या, त्यापैकी दोन गुवाहाटीमध्ये जप्त करण्यात आल्या. शिवसागर आणि लखीमपूर येथे प्रत्येकी दोन आणि नागाव आणि नलबारी येथे प्रत्येकी एक 'बॉम्बसदृश वस्तू' जप्त करण्यात आल्याचे दिगंत बराह यांनी सांगितले.