India-Myanmar Border: भारत-म्यानमार सीमेवर कुंपण करणार, गृहमंत्री अमित शाहांची घोषणा
Amit Shah | Twitter

भारत म्यानमार (Myanmar Border) सिमा अधिक सुरक्षीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. म्यानमारच्या सीमेवर आता फेन्सिंग करण्यात येणार आहे. त्याशिवाय ये जा ही परवानगीशिवाय होणार नाही, या बद्दलची माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. म्यानमारचे 600 सैनिकांनी आणि लोकांनी मिझोराममध्ये घुसखोरी केली, यावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बोलत होते. मागील काही दिवसांपासून भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमावाद उफाळला होता. सीमारेषावर तणावाचं वातावरण होतं. (हेही वाचा - Avoid Non-Essential Travel: वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने जारी केली म्यानमारमधील नागरिकांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी)

मणिपूरच्या दंगलीमध्ये देखील म्यानमारचा हात असल्याचे समोर आले होते. म्यानमारमधून घूसखोरी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले होते. त्यामुळे केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मोठी घोषणा केली. म्यानमार सीमेवरील मोफत ये जा यापुढे बंद करण्यात येणार आहे. त्याशिवाय सीमेवर तारेचं कुंपण घातलं जाणार आहे. बांगलादेश सीमाप्रमाणेच आता म्यानमारचीही सीमा अधिक सुरक्षित करण्यात येणार आहे.

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारत आणि म्यानमार सीमाबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, भारत आणि म्यानमार बॉर्डर ही सीमा याआधी सर्वांसाठी खुली होती, पण यापुढे त्याला फेन्सिंग केले जाणार आहे. घुसखोरी आणि म्यानमारमधून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सरकार दोन्ही देशांमधील मुक्त संचारही बंद करणार आहे.