Ukraine मधून भारतीयांच्या सुरक्षित घरवापसी साठी एअर इंडियाचे विशेष पहिले विशेष विमान सज्ज
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Instagram)

टाटांच्या मालकीच्या एअर इंडिया (Air India) ने युक्रेनमधील (Ukraine) भारतीयांची सुटका करण्यासाठी एका विशेष विमानाची सोय केली आहे. याद्वारा भारतीय नागरिक ज्यामध्ये विद्यार्थी यांचादेखील समावेश असेल ज्यांनी आज रात्री युक्रेनच्या Boryspil विमानतळावरून सुरक्षित रिटर्नसाठी रजिस्ट्रेशन केलेल्यांचाच समावेश आहे.

एअर इंडियाचं पहिलं स्पेशल फ्लाईट (AI-1946)हे तीन उड्डाणांपैकी एक आहे. यामध्ये नागरिकांना भारतात सुरक्षित आणले जाणार आहे अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेसोबत बोलताना दिली आहे. सध्या भारतात परत येण्याची इच्छा असणार्‍यांसाठी फेरी फ्लाईट सोमवारी रवाना झालेले आहे.एअर इंडियाने यापूर्वीच त्यांच्याकडून 3 विमानं भारतीयांना परत आणण्यासाठी सज्ज असतील असं सांगण्यात आले आहे. ही 22,24 आणि 26 फेब्रुवारी दिवशी युक्रेन मधून भारतासाठी रवाना होणार आहेत. नक्की वाचा: Ukraine Crisis: रशियाकडून Donetsk आणि Lugansk या बंडखोर प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा, अमेरिका खवळली; यूक्रेन संघर्ष वाढला.

बोईंग ड्रीम लायनर AI-1947 फ्लाईट दिल्लीवरून युक्रेन साठी रवाना झाली आहे. यामध्ये 200 जणांसाठी आसनक्षमता आहे. सध्या युक्रेन आणि रशिया मध्ये संबंध ताणलेले असल्याने युक्रेनवर युद्धाचे ढग आहेत. भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या विशेष बैठकीत सर्व बाजूंनी अत्यंत संयम बाळगण्याची आणि परस्पर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी राजनैतिक प्रयत्न तीव्र करण्याच्या गरजेवर जोर दिला.

युक्रेनमधील घडामोडींवर UNSC ब्रीफिंगमध्ये बोलताना, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी TS Tirumurti यांनी हा प्रश्न राजनैतिक संवादातूनच सोडवला जाऊ शकतो यावर भर दिला आहे.