Air India (PC - Twitter)

Air India Namaste World Sale: टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया (Air India) कंपनीने ग्राहकांसाठी नवीन सेल सुरु केला आहे. ‘नमस्ते वर्ल्ड सेल’ (Namaste World Sale) असे या सेलचे नाव आहे. या ऑफरमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटे 1,799 रुपयांपासून सुरू होणार आहेत. हा सेल फक्त 4 दिवसांसाठी सुरु असणार आहे. या सेलचा लाभ फक्त 2 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून 5 फेब्रुवारीपर्यंत घेता येईल. या सेलमध्ये ग्राहक 2 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तिकीट बुक करू शकतात.

एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनानुसार, या सेलमध्ये देशांतर्गत फ्लाइटमधील इकॉनॉमी क्लासचे तिकीट 1,799 रुपयांपासून सुरू होते. तर, बिझनेस क्लासचे भाडे 10,899 रुपये आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये एकेरी इकॉनॉमी क्लासचे भाडे 3899 रुपयांपासून सुरू होईल आणि परतीच्या इकॉनॉमी क्लासचे भाडे 9600 रुपयांपासून सुरू होईल. (हेही वाचा: Ayodhya's Ram Temple Donations: अयोध्या राम मंदिरात 11 दिवसात तब्बल 11 कोटी रुपयांचे दान, प्राणप्रतिष्ठेनंतर 25 लाख भाविकांनी घेतले दर्शन)

जर तुम्हाला या सेलचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग करावे लागेल. तुम्ही एअर इंडियाच्या वेबसाइट आणि ॲपवरून फ्लाइट तिकीट बुक करू शकता. याद्वारे तुम्ही सेवा शुल्कातही बचत करू शकता. ऑफर अंतर्गत जागा मर्यादित आहेत आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर त्या दिल्या जातील. एअर इंडिया एअरलाईननुसार, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया, आखाती आणि मध्य पूर्व, आशिया पॅसिफिक आणि दक्षिण आशियासाठी या सेल अंतर्गत तिकिटे बुक केली जाऊ शकतात. एअरलाइनने एक्झिक्युटिव्ह आणि प्रीमियम इकॉनॉमी क्लाससाठी विशेष भाडेही सुरू केले आहे.