दिल्ली सॅन फ्रान्सिस्को फ्लाईट । X

20 तास उशिर झालेल्या एअर इंडिया (Air India) च्या विमानात प्रवाशांचे हाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिकोला जाणार्‍या या विमानातील हा प्रकार असून विमानात एसी देखील बंद असल्याने काही जण चक्कर येऊन पडल्याचा प्रकार सामोर आला आहे. AI 183 या विमानातील हा प्रकार असून प्रवाशांचे बोर्डिंग झाले मात्र विमान उडू न शकल्याने त्यांना दिल्ली विमानतळावर 8 तास एसी विनाच बसवून ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पत्रकार Shweta Punj यांनी X वर या प्रकरणातील काही तपशील शेअर केले आहेत त्यामध्ये काही जण चक्कर येऊन पडल्यानंतर क्रू ने काही जणांना बाहेर जाण्याची परवानगी दिली. दिल्लीत सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे. त्यांनी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि एअर इंडिया ला देखील टॅग करत या प्रकाराची माहिती देताच विमान कंपनीने त्याचि दखल घेतली.

प्रवाशांच्या तक्रारी

DGCA च्या जारी SOP मध्ये "बोर्डिंग नाकारल्यामुळे, उड्डाणे रद्द करणे आणि उड्डाणांना होणारा विलंब यामुळे एअरलाइन्सद्वारे प्रवाशांना सुविधा पुरविल्या जाव्यात" असे म्हटले आहे. जर विमानांना 3 तासापेक्षा अधिक उशिर होणार असेल तर त्यांना तातडीने एसओपी चं पालन करण्याच्या सूचना आहेत.