Exit Poll Results 2019 नंतर शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 38,784 तर निफ्टी 11,700 वर पोहचला
शेअर बाजार (Photo Credits: PTI)

लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदानाचे सातही टप्पे पार पडल्यानंतर 19 मे च्या संध्याकाळी एक्झिट पोल चे निकाल जाहीर करण्यात आले. बहुतांश सर्व्हेच्या निकालानुसार यंदा एनडीएच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. त्यामुळे पुन्हा मोदी सरकार सत्तेत येण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहे. एक्झिट पोलच्या निकालाचा परिणाम आज सोमवारी (20 मे) शेअर बाजारावरही दिसला. आज सेन्सेक्स 888.91अधिक अंकांनी तर निफ्टी 284.15 अधिक अंकांनी उघडल्याचे दिसून आले आहे.Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार

ANI Tweet:  

आज शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी कितीवर ?

एक्झिट पोलनंतर सुरू झालेल्या आजच्या नव्या आठवड्यात सेंसेक्स 38,784.77 आणि निफ्टी 11,700 वर उघडली आहे. त्यामुळे शेअर बाजरात सध्या आनंदांचं वातावरण आहे. Maruti Suzuki चे शेअर्स 5% अधिक म्हणजे 7,032 वर आहेत. तर L&T चे शेअर्स 4% ने वधारले आहेत. Reliance Industries ने सात महिन्यातील सर्वाधिक उसळी घेतली आहे.

एक्झिट पोल हे केवळ अंदाज आहेत. येत्या 23 मे दिवशी लोकसभा निवडणूक 2019 चे अंतिम निकाल हाती येणार आहेत.