आजकाल सोशल मीडियावर कागदाचे एक कात्रण व्हायरल होत आहे. या कात्रणामधील मथळाच असा आहे की, ही बातमी अनेक लोक शेअर करत आहेत. या बातमीनुसार, आईने काळजावर दगड ठेवून लग्नानंतर मुलीची पाठवणी केली. मात्र त्यानंतर जावयाच्या मोठ्या भावावरच आईचा जीव जडला. हे प्रेमप्रकरण इतके वाढले की शेवटी आईने जावयाच्या मोठ्या भावाशी लग्नही केली. अशा प्रकारे आईच मुलीची थोरली जाऊ झाली आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये (Pathankot) ही घटना घडली आहे. या महिलेचे वय 37 वर्षे इतके आहे. महत्वाचे म्हणजे या महिलेचा काही दिवसांपूर्वीच आपल्या पूर्व पतीशी घटस्फोट झाला होता. आता घरच्यांनी या नव्या लग्नाला विरोध केल्यामुळे हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले आहे.
व्हायरल होत असलेले कात्रण -
मिळालेल्या माहितीनुसार, गुरदासपूरमधील हरिदरबार येथे राहणाऱ्या 21 वर्षीय मुलाची खानपूर येथील एका 18 वर्षीय मुलीशी फेसबुकवर मैत्री झाली. बर्याच भेटीनंतर ते दोघे प्रेमात पडले आणि 6 महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले. दरम्यान, या मुलाच्या 22 वर्षीय मोठ्या भावाचे पठाणकोट म्हणजेच आपल्या भावजयीच्या गावी नेहमी येणे जाणे होत असे. या काळात मुलीची आई या जावयाच्या मोठ्या भावाच्या प्रेमात पडली. पुढे हे प्रेम इतके वाढले की शेवटी दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. (हेही: लग्न कधी करतेय? या प्रश्नपासून सुटका मिळवण्यासाठी ऑक्सफर्डच्या विद्यार्थिनीने केलं स्वतःशीच लग्न)
त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिवशी या महिलेने मलिकपूरमधील एका मंदिरात जावयाच्या भावासोबत लग्न केले. जेव्हा या महिलेच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला तेव्हा तिने न्यायालयात संरक्षणासाठी अर्ज केला. त्यानंतर ही घटना समोर आली. दरम्यान या महिलेचा पती शहरात एक लहान दुकान चालवत आहे, 20 सप्टेंबर रोजी महिलेने आपल्या 42 वर्षीय पतीला घटस्फोट दिला आणि पोटगी म्हणून 5 लाख रुपयेही प्राप्त केले. आता ही महिला आपल्या नव्या पतीसह आनंदाने राहत आहे.