Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मॉडेलिंगच्या नावाखाली अनेक तरुण-तरुणींना जाळ्यात ओढून त्यांच्याद्वारे अश्लिल चित्रपटाचे (Adult Movies) चित्रिकरण करणाऱ्या एका व्यक्तीस इंदौर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बृजेंद्र सिंह (Brijendra Singh) असे या इसमाचे नाव आहे. मूळचा भिंड येथील रहिवासी असलेला ब्रजेंद्र एका प्रकरणात जामीन करण्यासाठी मुंबई येथून इंदौर (Indore) येथे आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रजेंद्र सिंह नावाचा हा व्यक्ती अनेक तरुण-तरुणींना मॉडेलिंगच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढत असे आणि त्यांच्याकडून पॉर्न फिल्म (Porn Film) बनविण्यासाठी अश्लिल कृत्य करुन घेत असे. दरम्यान, सांगितले जात आहे की आरोपी बृजेंद्र याचे बॉलिवूडमध्येही बरेच मोठे नेटवर्क आहे. या प्रकरणात इंदौर पासून मुंबई पर्यंत अनेक लोक गुंतल्याची प्रथामिक माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे वृत्तही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

बृजेंद्र सिंह याने काही दिवसांपूर्वीच इंदौर येथील एका तरुणीला फार्म हाऊसवर बोलावून मॉडेलिंगमध्ये काम मिळवून देतो, असे सांगत तिची अश्लिल चित्रफीत बनवली. आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार दिली. प्राप्त तक्रारीनुसार गुन्हा नोंदवत पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी आरोपी बृजेंद्र सिंह याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तरुणीने म्हटले आहे की, आरोपीने आपल्याला सांगितले की, तुला बोल्ड सीरीजसाठी काही सीन द्यायचे आहेत. तसे सांगून त्याने काही सीन शुट केले... तसेच अश्लील सीन हटवले जातील असेही तो म्हणाला. परंतू, पुढे तसे काहीच घडले नाही त्याने तो व्हिडिओ अश्लिल वेबसाईट्सवर अपलोड केला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच तरुणीने सायबर पोलिसांत तक्रार दिली. आयएएनएस या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, अंघोळ करणाऱ्या महिलेचा अश्लिल व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला अटक)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंदौर येथील एरोड्रम परिसरातील एका फार्म हाऊसवर एडल्ट मुव्ही शूट करण्यात आली होती. त्यासाठी फार्म हाऊस मालकाला प्रतिदिन 25 हजार रुपये दिले जात असत. हे संपूर्ण नेटवर्क मुंबईत असलेले अशोक सिंह आणि विजयानंद पाण्डेय पाहात असत. हे लोक पॉर्न वेबसाईट्स, अडल्ट वेब साईट्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी लाखो रुपयांचा नफा कमवून या फिल्म्सचा सौदा करत असत, असे भास्कर डॉट कॉम या संकेतस्थळाने आपल्या वृत्तत म्हटले आहे.

अधिक नफा कमावण्यासाठी अनेकदा कोणत्याही प्रकारचे एडीटींग न करता या फिल्म पॉर्न साईट्सवर विकल्या जात असत. त्यासाठी या रॅकेटमधील लोक मॉडेल्सना 5 ते 10 हजार रुपये देत असत. आरोपी बृजेंद्र सिंह याने इंदौरमध्ये अनेक एडल्ट फिल्म आणि गाणी शुट केली आहेत. तो वेब सीरिज आणि सीरियल बनविण्यासाठी मॉडेल कास्टींग करत असे. त्याने हॉलिवूडच्याही काही चित्रपटांमध्ये काम केल्यची चर्चा आहे. त्याचे मुंबईत बॉलिवूडमध्येही मोठे नेटवर्क असल्याचे समजते. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिस आरोपीकडे अधिक चौकशी करत आहे. जी नावे पुढे येतील त्या सर्वांना ताब्यात घेतले जाईल.

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, आरोपी डायरेक्टर बृजेंद्र गुर्जर, राजेश गुर्जर, अंकित चावडा, मिलिंद डाबर सुनील जैन, अनिल द्विवेदी, विजयानंद पाण्डेय, अजय गोयल, गजेन्द्र सिंह, युवराज, प्रमोद सिमरिया और योगेन्द्र जाट यांची नावे पुढे आली आहेत. हे नेटवर्क मुंबई आणि बॉलिवूडपर्यंत पसरल्याचा पोलिसांनाही संशय आहे.