अंघोळ करणाऱ्या महिलेचा अश्लिल व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ठाणे (Thane) येथे एका 34 वर्षीय तरुणाने अंघोळ करणाऱ्या महिलेचा अश्लिल व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी तरुण हा मुंबईतील आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) या नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारा आहे.

अविनाश कुमार यादव असे या आरोपीचे नाव आहे. अविनाश याच्यावर या प्रकरणी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला ती अंघोळ करत असताना बाथरुमच्या खिडकीजवल मोबाईल आढळून आला. त्यावेळी महिलेने या प्रकरणी नवऱ्याला मोबाईलबद्दल सांगितले. तसेच मोबाईलमध्ये पीडित महिलेचा अंघोळीचा व्हिडिओ त्यांनी पाहिला. या प्रकरणी दापंत्यांनी कापुरबावडी पोलिस स्थानकात धाव घेत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

(हेही वाचा-नातेवाईकांकडून महिलेला विवस्त्र करुन मारहाण; औरंगाबाद येथील घटना)

पोलिसांनी आरोपीला पीडित महिलेच्या बाजूच्या कॉलनीतून अटक केली आहे. तसेच आरोपीच्या मोबाईलमध्ये त्या कॉलनीतील आणखी काही दापंत्यांचे अश्लिल व्हिडिओ शूट केल्याचे मोबाईलमध्ये दिसून आले आहे.