AAP Candidates List for Delhi Assembly Elections: आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 38 उमेदवारांची नावे आहेत. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिषी यांचीही नावे या यादीत आहेत. अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून तर आतिशी कालकाजीतून निवडणूक लढवणार आहेत. याआधी पक्षाने 3 याद्या जाहीर केल्या आहेत. यावेळी पक्षाने कोणत्याही पक्षासोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, यावेळी आप पक्ष एकट्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून सर्व 70 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करणार आहे. आम आदमी पार्टीने (AAP) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 13 डिसेंबर 2025 रोजी तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये नजफगड विधानसभा मतदारसंघातून तरुण यादव हे फक्त एका उमेदवाराचे नाव होते. बुधवार, 11 डिसेंबर रोजी तरुण यादव आपल्या पार्षद पत्नी मीना यादवसोबत आम आदमी पार्टीत आले होते. पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी त्यांना सदस्यत्व दिले होते. (हेही वाचा -Kailash Gahlot Quits AAP: 'आप'ला मोठा धक्का! मंत्री कैलाश गेहलोत यांचा पक्षाला रामराम; दिल्ली सरकारवर गंभीर आरोप)
AAP releases the fourth and final list of 38 candidates for the Delhi Elections 2025.
Party's national convener Arvind Kejriwal to contest from New Delhi, CM Atishi from Kalkaji, minister Saurabh Bharadwaj from Greater kailash, minister Gopal Rai from Babarpur, Satyendra… pic.twitter.com/xpLwjzINNo
— ANI (@ANI) December 15, 2024
दुसरी यादी 9 डिसेंबरला जाहीर -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आम आदमी पार्टीने 9 डिसेंबर रोजी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 20 उमेदवारांची नावे होती. त्यात मनीष सिसोदिया यांचेही नाव होते, त्यांची जागा यावेळी बदलण्यात आली आहे. मनीष सिसोदिया सध्या पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र, यावेळी ते जंगपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. नुकतेच पटपर्जंगमधून पक्षात दाखल झालेले अवध ओझा यांना तिकीट देण्यात आले आहे. पटपडगंजमधून तीन वेळा आमदार राहिलेल्या सिसोदिया यांची जागा बदलण्यात आली कारण त्यांनी गेल्या निवडणुकीत फार कमी मतांनी विजय मिळवला होता. (Atishi Marlena Net Worth: अतिशी मार्लेना यांची एकूण संपत्ती किती? दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याचे शिक्षण काय?)
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP च्या अंतिम यादीत बहुतेक नावे अशी आहेत ज्यांनी 2020 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. सीएम आतिशी कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन, गोपाल राय आणि मुकेश कुमार यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. याशिवाय 'आप'ने पक्षातील सोमनाथ भारती, दुर्गेश पाठक आणि अमानतुल्ला खान या बड्या चेहऱ्यांवरही विश्वास व्यक्त केला आहे.