Atishi Marlena | (Photo Credit- X/@ANI)

Atishi Marlena Net Worth and Financial Profile: आतिशी मार्लेना यांची एकूण संपत्ती किती? असा सवाल त्यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यापासून कुतुहलापोटी विचारला जातो आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आतिशी यांची एकूण मालमत्ता 1.41 कोटी रुपये आहे, ज्यात कोणतीही सूचीबद्ध दायित्वे नाहीत. ही माहिती आणि आकडेवारी त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अधिकृत शपथपत्रानुसार उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घोषनेनंतर आतिशी मार्लेना यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) विधानसभा आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केजरीवाल आज दुपारी 4.30 वाजता उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची भेट घेणार आहेत. या घोषणेसह, आतिशी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्या पावलावर पाऊल ठेवत दिल्लीत मुख्यमंत्री पदावर असणारी तिसरी महिला बनली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासह सध्या त्या दुसरी महिला मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतील.

अतीशी यांच्या मालमत्तेचे सविस्तर विभाजन:

शैक्षणिक पार्श्वभूमी आणि राजकीय प्रवास

आतिशी मार्लेना यांची शैक्षणिक कामगिरी प्रभावशाली आहे. त्यांची शैक्षणीक कारकीर्द खालीलप्रमाणे:

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी आतिशी आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली स्कूलमध्ये इतिहास आणि इंग्रजी शिकवत होत्या. आम आदमी पार्टी (आप) चा भाग म्हणून, त्या आता दिल्ली सरकारमध्ये वित्त, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), शिक्षण आणि बरेच काही यासह एक विशाल पोर्टफोलिओ व्यवस्थापित करतात. सध्या त्या 11 प्रमुख विभागांची देखरेख करतात, जी दिल्ली मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याकडे आहे.

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची आर्थिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी राष्ट्रीय राजधानीच्या भविष्यातील शासन व्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.