दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे राजधानीचे शहर असणाऱ्या या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) कोणता चेहरा देतो आणि केजरीवाल यांचे उत्तराधिकारी म्हणून कोण धुरा सांभाळते, याबाबत उत्सुकता होती. जी आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांच्या नावामुळे संपुष्टात आली आहे. पक्षाने जाहीर केल्यानुसार दिल्लीती आप (AAP) सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आतिशी मार्लेना सिंह (Atishi Marlena Singh) आता मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. दिवंगत नेत्या शीला दीक्षित (Sheila Dikshit) यांच्यानंतर प्रथमच एका महिलेला पुन्हा एकदा दिल्लीची सूत्रे सांभाळण्याची संधी मिळणार आहे. जाणून घेऊनया कोण आहेत आतिशी मार्लेना? (Who Is Atishi Marlena)
मनीष सिसोदिया यांचाही आतिशी यांना पाठिंबा
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवास्थानी विधिमंडळ पक्षाची एक बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी आपण आगोदरच जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहोत असे सांगतानाच आतिशी मार्लेना सिंग या आपल्या उत्तराधीकारी असतील अशी घोषणा केली. महत्त्वाचे म्हणजे केवळ केजरीवालच नव्हे तर पक्षात क्रमांक दोनचे आणि महत्त्वाचे नेते असलेल्या मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा देखील आतिशी यांना पाठिंबा आहे. (हेही वाचा, Atishi Marlena Delhi's New CM: आपच्या आतिशी मार्लेना दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री, केजरीवाल संध्याकाळी देणार राजीनामा)
कोण आहेत आतिशी मार्लेना सिंह?
आम आदमी पक्ष संघटनेमध्ये जे काही अभ्यासू आणि आक्रमक चेहरे आहेत त्यापैकी एक म्हणून आतिशी मार्लेना यांचे नाव घेतले जाते. मुख्यमत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिश सिसोदिया यांना दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक झाल्यानंतर त्या पक्षाच्या प्रमुख चेहरा बनल्या होत्या. पक्ष आणि आपल्या नेत्यांच्या भूमिका प्रसारमाध्यमे आणि जनमानसात त्या नेटाने मांडत होत्या. केजरीवाल सरकारमध्ये त्यांच्याकडे शिक्षण, P.W.D., संस्कृती आणि पर्यटन अशा विविध खात्यांचा कारभार होता. सन 2015 ते 2018 या काळात मनिश सिसोदिया यांच्या शिक्षण मंत्रालयाच्या सल्लागारसुद्धा होत्या. (हेही वाचा, Who Will Replace Arvind Kejriwal: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा, कैलाश गहलोत, संजय सिंग या नेत्यांची नावे चर्चेत)
मार्लेना नावाचे वैशिष्ट्य
सन 1981 मध्ये जन्मलेल्या आतिशी यांना मार्लेना हे नाव त्यांचे पालक विजय सिंह आणि तृप्ती वाई यांच्याकडून प्राप्त झाले. आम आदमी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे नाव म्हणजे मार्क्स आणि लेनीन यांच्या नावांची रसमिसळ (portmanteau) आहे. दरम्यानच्या काळात (2018) त्यांनी आपले आडनाव वापरणे बंद केले आणि त्या केवळ आतिशी म्हणूनच वावरु लागल्या.
शिक्षण
आतिशी मार्लेना उच्चशिक्षीत आहेत. त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण स्प्रिंगडेल्स स्कूल (पुसा रोड), नवी दिल्ली येथे पूर्ण केले. तर, 2001 मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून इतिहास विषयात बॅचलर डिग्री मिळवली. पुढे आम आदमी पक्षाच्या चेहरा बनलेल्या या नेत्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात देखील शिक्षण घेतले आहे. ऑस्सफर्डमधून त्यांनी चेवनिंग शिष्यवृत्ती मिळवली आणि 2003 मध्ये इतिहासात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. रोड्स विद्वान म्हणून, आतिशीने 2005 मध्ये ऑक्सफर्डमधील मॅग्डालेन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
आतिशीचा राजकारणात प्रवेश
आतिशी यांनी सन 2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख चढताच राहिला आहे. पक्षाचे धोरण, भूमिका आणि संसदीय राजकारण यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. राजकीय कामांसोबतच 2015 मध्ये त्यांनी मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील ऐतिहासिक जल सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यानंतर झालेल्या निषेध आणि कायदेशीर लढाई दरम्यान आप नेते आणि कार्यकर्ते आलोक अग्रवाल यांना पाठिंबा दिला.
अरविंद केजरीवालयांनी उत्तराधिकारी निवडला
CM Arvind Kejriwal proposes Delhi minister Atishi as his successor: Party
— Press Trust of India (@PTI_News) September 17, 2024
विधानसभेत पराभव
दरम्यान, आम आदमी पक्षाने त्यांना लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मैदानात उतरवले. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) गौतम गंभीर यांनी त्यांचा 4.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. दरम्यान, पक्षाने त्यांना विधानसभा निवडणूक 2020 मध्येही मैदानात उतरवले मात्र ना दक्षिण दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून भाजपच्या धरमबीर सिंग यांचा 11,000 मतांनी पराभव केला. पराभवाचा धक्का पचवलेल्या आतिशी आता थेट मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कारभार हाती घेणार आहेत.