सरकारकडून आज पुन्हा एकदा देशातील नागरिकांनी त्यांचे महत्वाच्या कागदपत्रांना आधार कार्डसोबत लिंक करण्याबाबत सुचना दिली आहे.सध्या आधार कार्ड (Aadhar Card) व्यक्तीचे एकप्रकारचे ओळख पत्र बनले आहे. त्यामुळे आधार कार्डशिवाय कोणतेही शासकीय काम करताना अडथळा उद्धभतो. परंतु आता आधार कार्ड पुढील 6 दिवसात पॅन कार्डला (PAN Card) लिंक करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. तर आधार कार्ड पॅन कार्डला लिंक न केल्यास तुमची काही महत्वाची कामे थांबणार आहेत.
30 सप्टेंबर ही आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्याची शेवटची तारीख असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आयकर विभागाकडून आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच लिंकअप न केल्यास 1 ऑक्टोंबर पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. यापूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलेल्या वेळेत लिंक न केल्यास तोपर्यंत तुम्हाला पॅन कार्डचा वापर ट्रांजेक्शन करण्यासाठी करता येत नव्हता. तर 30 सप्टेंबर पूर्वी तुम्ही पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणार असाल तर यापूर्वी निष्क्रिय झालेले पॅन कार्ड पुन्हा अॅक्टिव्ह होणार की नाही हे तुम्हाला कळणार आहे. (आधार कार्डवरील 'या' गोष्टींबाबत अपडेटसाठी आता कागदपत्रांची गरज भासणार नाही)
त्यामुळे जर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करायचे असल्यास प्रथम आयकर विभागाच्या e-Filing Website www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जावे. येथे गेल्यावर डाव्या बाजूला Link Aadhar ऑप्शन दाखवण्यात येईल. त्यानंतर तेथे गेल्यावर तुम्हाला तुमचा पॅन, आधार कार्ड क्रमांक आणि आधार कार्डवरील नाव लिहायचे आहे. असे केल्यावर 'I Have Only Year Of Birth In Aadhaar Card' या ऑप्शन दाखवला जाईल. या ऑप्शनवर क्लिक करा. पुढे नाव आणि अन्य माहिती दिल्यावर एक ओटीपी किंवा कॅप्चा कोड दाखवला जाईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलकवर आलेल्या ओटीपी पोस्ट करत Link Aadhar या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुमचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक होणार आहे.