आधार कार्डवरील 'या' गोष्टींबाबत अपडेटसाठी आता कागदपत्रांची गरज भासणार नाही
Aadhar Card (Photo Credits-Twitter)

आधार कार्ड (Aadhar Card) हे सध्या सर्व महत्वाच्या कामात उपयोगी पडत असून त्याच्या माध्यमातून नागरिकाची ओखळ पटवण्यास मदत होते. मात्र आधार कार्ड मध्ये काही वेळेस चुका सुद्धा आढळून येतात. त्यामुळे आधार कार्डवरील काही चुका किंवा अन्य गोष्टींबाबत बदल करायचा असल्यास कागदपत्रे सादर करणे अत्यावश्यक आहे. परंतु आता आधार कार्डवरील काही गोष्टींबाबत अपडेट करण्यासाठी कादपत्रे जमा करण्याची गरज नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फोटो, बायोमेट्रिक, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक, इमेल मध्ये अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला नजीकच्या आधार कार्ड केंद्रात फक्त कार्ड घेऊन जावे लागणार आहे. याबाबत युडीआयय (UDI) यांनी ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे.

यापूर्वी युडीआय यांनी ट्वीट करत आधार कार्डसाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांसंबंधित एक लिस्ट जाहीर केली होती. त्यामध्ये कार्ड अपडेट करण्यासाठी अर्जदाराचे नाव आणि जन्मासंबंधित माहिती, बायोमेट्रीक,फिंगर प्रिंट आणि फोटो देणे अत्यावश्यक आहे.(बॅंक व्यवहारादरम्यान चूकीचा आधार कार्ड क्रमांक दिल्यास होऊ शकतो 10,000 रूपयांचा दंड)

Tweet:

त्याचसोबत अर्जदाराला आधार कार्ड संबंधित uidai.gov.in वर अधिक माहिती उपलब्ध आहे. तसेच नवीन आधार कार्ड किंवा अन्य गोष्टीबाबत ही या संकेतस्थळावर युजर्सला सांगण्यात येते. परंतु चुकीची माहिती किंवा खोटी माहिती आधार कार्डसाठी दिल्यास अर्जदाराला मोठी शिक्षा होऊ शकते.(आधार कार्ड अपडेट: नाव, नंबर, पत्ता बदलण्यासाठी दरात बदल, द्यावे लागणार अधिक शुल्क)

तसेच UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी विविध सुविधा सुरु केली असल्याने त्यांची ओखळ कायम राहणार आहे. त्यामधीलच एक mAadhaar हे स्मार्टफोनसाठी अॅप सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे आधार कार्ड धारक हे कार्ड त्याच्या स्मार्टफोनमध्ये सुरक्षित ठेवू शकणार आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड कुठेही आणि कसेही उपयोगात आणता येणार आहे.