अभिनेत्री व भाजप नेत्या जयप्रदा कायदेशीर अडचणीत; रामपूर कोर्टाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट
जया प्रदा (Photo Credits: IANS)

2019 च्या लोकसभा निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार असलेल्या अभिनेत्री जया प्रदा (Jaya Prada) सध्या कायदेशीर प्रकरणात अडकल्या आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कोर्टाने अभिनेत्री आणि भाजप नेत्या जयप्रदा यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट (Non Bailable Warrant) जारी केले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी होईल. रामपूर (Rampur) आचारसंहिता प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्याच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याचबरोबर, केमेरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या गुन्ह्याची पुढील सुनावणी 27 मार्च रोजी होईल.

माजी खासदार जयप्रदा यांनी गेल्या वर्षी भाजपच्या तिकिटावर लोकसभा पोटनिवडणूक लढविली होती. यावेळी त्याच्यावर आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल झाले. यातील एक गुन्हा केमेरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला, तर दुसरा कोतवाली येथे नोंदविण्यात आला. याबाबत पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता या प्रकरणात सुनावणी सुरू झाली आहे. जयाप्रदा रामपूर येथून दहा वर्षांपासून समाजवादी पक्षाच्या सदस्या होत्या. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या भाजपाच्या उमेदवार होत्या. त्यावेळी त्यांना बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पक्षाचे संयुक्त उमेदवार, आझम खान यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. (हेही वाचा: अभिनेत्री जयाप्रदा जेव्हा शाळकरी मुलांसमोर 'Country' ची स्पेलिंग चुकतात..(Watch Video))

निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर स्वार पोलिस ठाण्यात आचारसंहिता उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वारमधील नूरपूर गावात त्यांनी रस्त्याचे उद्घाटन केले होते, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात दंडाधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्या न्यायालयात हजर होऊ शकल्या नाहीत. सध्या जयप्रदा यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आझम खानसुद्धा एका फसवणूकीच्या प्रकरणात तुरूंगात आहेत.