7th Pay Commission Latest News: सातव्या वेतन आयोगासंबंधित बातम्या नेहमीच चर्चेत असतात. त्याचसोबत शासकीय नोकरी करणाऱ्यांना याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते. याच दरम्यान तरुणांसाठी एक खुशखबर आहे. त्यानुसार पंबाजचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नव्याने नोकरी मिळालेल्या तरुणांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.(Logo and Tagline for Passport Seva Program: स्वत: ला Creative समजत असाल तर डिझाइन करा पासपोर्टचा लोगो आणि सुचवा टॅगलाइन; सरकार देईल रोख बक्षीस)
अमरिंदर सरकारने सातवे वेतन आयोग लक्षात घेता नव्या पे स्केल दिला जाणार आहे. त्याचसोबत सिव्हिल सर्विसेस नियमांच्या संशोधनाला सुद्धा काँग्रेस सरकारला हिरवा झेंडा दाखवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या बैठकीत मुख्य निर्णय घेण्यात आले आहेत.(7th Pay Commission: 'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सेवानिवृत्तीच्या वयात होणार वाढ)
दरम्यान, वर्च्युअल कॅबिनेट बैठकीवेळी सॅलरी स्केल नुसार नव्या नियुक्ती/भरती साठी विविध निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार नव्या भरतीनुसार याचा फायदा नक्कीच तरुणांना होणार आहे.