70th Republic Day: देशभरात आज (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. राजधानी दिल्लीतही (Delhi Capital of India) प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसांडून वाहतो आहे. कोणातीह अनुचीत प्रकार टाळण्यासाठी राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर, राजपथावर (Rajpath) भारतीय लष्कर संचलन (Rajpath Parade 2019) करत आहे. या संचलनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी सामर्थ्याचे जगाला दर्शन घडत आहे. राष्ट्रपती (President) रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडल्यावर पथसंचलनास सुरुवात झाली. दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
आज कडेकोट बंदोबस्तात असलेल्या राजधानी दिल्लीतील विजय चौक येथून संचलनास प्रारंभ झाला. हे संचलन राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचणार असून, येथे या संचलनाची सांगता झाली. साधार 90 मनिटे हे संचलन चालले. या संचलनात 22 राज्यांचे चित्ररथ सहभागी झाले. याशिवाय केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथही सहभागी झाले. या सोहळ्याची काही क्षणचित्रे खास आपल्यासाठी. (हेही वाचा, 'स्वतंत्रते न बघवते...!', राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्र हल्ला; प्रजासत्ताक धोक्यात असल्याचा इशारा)
Awesome Aerobatics - Rapt spectators !
#RepublicDay2019 Parade on @DDNational & Live-Stream on https://t.co/doXKK2sVDM … … #RepublicDayOnDD #RepublicDay #Doordarshan #70thRepublicDay #RepublicDayIndia #गणतंत्रदिवस
WATCH NOW - pic.twitter.com/qsHg4HsXq5
— Doordarshan National (@DDNational) January 26, 2019
WATCH NOW -
Breath taking performance at #RepublicDay2019 Parade on @DDNational & Live-Stream on https://t.co/doXKK2sVDM #RepublicDayOnDD #RepublicDay #Doordarshan #70thRepublicDay #RepublicDayIndia #गणतंत्रदिवस pic.twitter.com/GesCEVQeBH
— Doordarshan National (@DDNational) January 26, 2019
WATCH NOW -#RepublicDayParade #RepublicDay on favourite channel @DDNational & Live-Stream on https://t.co/doXKK2sVDM #RepublicDayOnDD #RepublicDayParade #RepublicDay2019 #RepublicDay #Doordarshan pic.twitter.com/IoJu59JSoI
— Doordarshan National (@DDNational) January 26, 2019
Visuals of the K-9 Vajra-T, a self-propelled howitzer, commanded by Captain Devansh Bhutani #republicdayindia pic.twitter.com/czufPJMQBK
— ANI (@ANI) January 26, 2019
Visuals of the T-90 (Bhishma), the main battle tank of the Indian Army, commanded by Captain Navneet Eric of 45 Cavalry #RepublicDay2019 pic.twitter.com/NjGHg2oMDS
— ANI (@ANI) January 26, 2019
Delhi: Prime Minister Narendra Modi greets Dr.Manmohan Singh at Rajpath. #RepublicDay2019 pic.twitter.com/nuT65NVjbi
— ANI (@ANI) January 26, 2019
Prime Minister Narendra Modi pays tribute at the Amar Jawan Jyoti. #RepublicDay2019 pic.twitter.com/mykhT7oxxP
— ANI (@ANI) January 26, 2019
दरम्यान, राजधानी दिल्लीत संचलनाची धूम सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला भारतीय प्रजासत्ताक दिनाला गालबोट लावण्यासाठी पाकिस्तान आणि पाकिस्तानचे दहशतवादी जंग जंग पछाडत आहे. मात्र, भारतीय लष्कराचे जवान प्रत्येक वेळी त्यांचा प्रयत्न केवळ हानूनच पाडत नाहीत तर, उधळून लावत आहेत. शनिवारी (26 जानेवारी) सकाळपासून पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir)येथे भारीतय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी हा कट दोन वेळा उधळून लावला. या वेळी श्रीनगर आणि पुलवामा या ठिकाणी भारतीय जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांना ठार केले.