असाम येथे आज आणखी 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 7 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आंतरराष्ट्रीय
Poonam Poyrekar
|
Nov 07, 2020 11:49 PM IST
कोरोना व्हायरस महामारीच्या (Coronavirus Pandemic) दरम्यान विधानसभेच्या निवडणूका ठेवणारे बिहार (Bihar Assembly Election 2020) हे पहिले राज्य ठरले असून आज या निवडणूकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा (Third Phase) होत आहे. यासाठी बिहारमधील मतदान केंद्रावर योग्य ती तयारी करण्यात आली असून पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. आज या निवडणूकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. या तिस-या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत मतदान केंद्रावर योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. हे मतदान सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार आहे.
दरम्यान बिहार विधानसभा मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नागरिकांना घराबाहेर पडून योग्य ती काळजी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे अनिवार्य आहे असेही सांगितले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर दुसरीकडे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत ब-याच घडामोडी घडताना दिसत आहे. यात डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र एकूणच परिस्थितीवरुन दिसत आहे.