Coronavirus: औरंगाबादमध्ये आज 63 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1767 वर पोहोचली
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज सकाळी 63 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 767 वर पोहोचली आहे. यातील 1हजार 113 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे.

दरम्यान, आज आढललेल्या रुग्णांमध्ये 26 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आज सापडलेले कोरोना रुग्ण क्रांती नगर (1), विजय नगर, गारखेडा (1), एन सहा संभाजी कॉलनी (6), अयोध्या नगर (1), न्यू हनुमान नगर (1), कैलास नगर (1), अजिंक्य नगर, गारखेडा (3), बेगमपुरा (2), लेबर कॉलनी (1), पडेगाव (1), बायजीपुरा (1),हर्सुल परिसर (1), भारतमाता नगर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), रोशन गेट (2), देवळाई चौक परिसर (1), समर्थ नगर (1), शिवशंकर कॉलनी (5), सुंदर नगर, पडेगाव (1), गणेश कॉलनी (2), एन चार , समृद्धी नगर,सिडको (2), कटकट गेट, नेहरू नगर (1), आंबेडकर नगर, एन -7 (3), शिवाजी कॉलनी (1), सईदा कॉलनी (1), चेतना नगर (2), एन-सात सिडको (1), एन-2विठ्ठल नगर (1),विनायक नगर, जवाहर कॉलनी (1), बारी कॉलनी (1), हनुमान नगर, गारखेडा (1), मील कॉर्नर (1), एन चार (1), एन 1,सिडको (1), जय भवानी नगर (1), राजा बाजार (4), अन्य (6) या भागातील आहेत. (हेही वाचा - Mumbai Rains: मुंबई सह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी; सायन परिसरातील सखल भागात पाणी साचले (See Pics))

औरंगाबादमध्ये बुधवारी खासगी रुग्णालयामध्ये एका 43 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 89 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दिवसभरात 2 हजार 560 रुग्णांची वाढ झाली तर, 122 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 74 हजार 860 वर पोहोचली आहे.