मध्य प्रदेश-छत्तीसगड महसूल गुप्तचर संचालनालयाच्या युनिटची कारवाई; 1 हजार 534 किलो गांजा जप्त, पाच जणांना अटक ; 5 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Jan 05, 2021 11:46 PM IST
ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अशात आता पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यास मदत होणार आहे. या लॉकडाऊनची सुरुवात देशातील शाळांपासून होणार आहे. ब्रिटनमध्ये 6 जानेवारीपासून सर्व शाळा बंद करण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्यात पुढील महिन्यात 10 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या निवडणुकीत शिवसेना आपलं स्थान बळकट करण्यासाठी गुजराती मतदारांना आवाहन करत आहे. यासाठी शिवसेनेने गुजराती मतदारांसाठी मेळावा आयोजित केला आहे. तसेच गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी शिवसेनेने 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
अरबी समुद्रात वाऱ्याच्या चक्रकार स्थितीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्याने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यातील काही भागाच ढगाळ वातावरण असणार आहे, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.