Wolf Attack in Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खांडवा (Khandwa) जिल्ह्यातील एका कुटुंबातील किमान पाच जणांवर शुक्रवारी लांडग्याने हल्ला (Wolf Attack) केला. हरसूद उपविभागीय पोलीस अधिकारी (SDOP) संदीप वास्कळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल खळवा तहसीलमधील मालगाव गावात पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर शेजारी व इतर लोक आले आणि त्यांनी लांडग्याचा पाठलाग केला.
प्राप्त माहितीनुसार, लांडग्याने एका महिल्याच्या हाताचा चावा घेतला आहे. तसेच इतर चार पुरुषांच्या हाताला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खांडवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. खंडवा विभागीय वन अधिकारी (डीएफओ) राकेश डामोर यांनी माध्यमांना सांगितले की, जखमींना रेबीजच्या गोळ्या आणि औषधे देण्यात आली आहेत. (हेही वाचा -Bahraich Wolf Attack: बहराइचमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू, आतापर्यंत एकूण 10 जणांना गमवावा लागला जीव, नागरिक दहशतीत)
कुटुंबावर हल्ला करणारा लांडगा पकडला गेला आहे की नाही हे कळू शकले नाही. वन्य प्राण्याची अद्याप सुटका करण्यात आलेली नाही. प्राण्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हल्ला केलेला प्राणी लांडगा होता हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, असंही राकेश डामोर यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या कथित व्हिडीओ क्लिपचा विचार करता, तो कोणता प्राणी होता हे सांगणे खूप घाईचे आहे. व्हिडिओमध्ये हा प्राणी मला लांडग्यापेक्षा थोडा लहान, दिसत आहे, असंही डीएफओ यांनी यावेळी सांगितलं. हा लांडगा असल्याच्या पोलिसांच्या दाव्याबद्दल विचारले असता, डामोर म्हणाले की, मी यावर भाष्य करणार नाही. या घटनेचा तपास सुरू आहे. पीडितांना जखमा झाल्या आहेत. परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांत, बहराइच जिल्ह्यात लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सात मुलांसह आठ मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच लाडग्याच्या हल्ल्यात सुमारे तीन डझन लोक जखमी झाले आहेत, असंही अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केलं.