मुंबईत पुढील 3 तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता ; 4 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jul 04, 2020 11:42 PM IST
आज महाराष्ट्रात बेंदूर सण साजरा केला जाणार आहे. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या या सणानिमित्त बैलांना सजवून त्यांना गोडाधोडाचे जेवण दिले जाते. शेतात मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. दरम्यान कोरोना व्हायरस संकटामुळे सण अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जाईल.
एकीकडे कोरोना व्हायरसचा उद्रेक देशासह राज्यात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 1,92,990 वर पोहचली असून त्यापैकी 104687 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 79911 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यात 8376 रुग्ण कोविड-19 च्या संसर्गामुळे दगावले आहेत. यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुंबईकरांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई ही शहरं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन वारंवार करण्यात येत आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या 6 लाखांच्या पार गेली असून 18 हजार हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने देशाचा रिकव्हरी रेट 60.73% वर पोहचला आहे.