कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत- कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर; 30 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Nov 30, 2020 11:47 PM IST
गुरु नानक देव हे शीख धर्मियांचे संस्थापक गुरु आहेत. धर्मांबाबत जागृती निर्माण करण्यासोबत शीख धर्माची शिकवण देणा-या गुरु नानक यांची आज 551 वी जयंती देशभरातून साजरी केली जात आहे. तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या गुरु नानक जयंती निमित्त गुरु नानक यांना अभिवादन मन की बात मधून केले. तसेच पंजाब मधील गुरु नानक यांचे प्रसिद्ध सुवर्ण मंदिर येथे भाविकांकडून प्रार्थना केल्या जात आहेत.
दुसऱ्या बाजूला आजही दिल्ली हरियाणा बॉर्डवर केंद्र सरकारच्या शेती कायद्यासंबंधित जोरदार आंदोलन केले जाणार आहे. या शेतकऱ्यांची सिंघु बॉर्डवरच अडवणूक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलिसांसह सुरक्षा बलाच्या जवानांना ही तैनात केले गेले आहे. तर शेतकऱ्यांनी अमित शहा यांनी दिलेला प्रस्ताव नाकारला असून आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी येथे दौरा करणार आहेत. सहा पदरी असलेल्या NH19 च्या महामार्गाच्या येथे भेट देणार आहेत. त्यानंतर देव दिवाळी निमित्त काशी विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडोअर प्रोजेक्ट आणि सारनाथ पुरातत्व साइट ला ही भेट देणार आहेत.
देशातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात बोलायचे झाल्यास एकूण संक्रमितांचा आकडा 1814515 वर पोहचला आहे. तसेच एकूण 46886 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून अद्याप 89905 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.