CSIF (Photo Credits-ANI)

भारतात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून यात आता कोविड योद्धांने (COVID Warriors) देखील कोरोनाची लागण झपाट्याने होत असून ही संख्या वाढत चालली आहे. भारतात गेल्या 24 तासांत CISF च्या 3 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सद्य स्थितीत CISF चे एकूण 118 जवान कोविड बाधित झाले आहे. ही आकडेवारी CISF च्या जवानांनी देखील 100 चा टप्पा ओलांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे.

या 118 कोविड बाधित CISF जवानांपैकी दिल्लीत 32, मुंबई 37, ग्रेटर नोएडा 2, कोलकाता 41, अहमदाबाद 5 आणि तमिळनाडूत 1 रुग्ण आहेत.

सद्य स्थितीत भारतात 85,940 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात गेल्या 24 तासांत 3970 रुग्ण आढळले असून एकूण 103 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

तर महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 29,100 इतकी झाली आहे. काल दिवसभरात राज्यात कोरना व्हायरस संक्रमित 1,576 नव्या रुग्णांची नोंद झाली. काल दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 49 रुग्ण दगावले.