Advertisement
 
मंगळवार, जुलै 01, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी विजय; 29 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या टीम लेटेस्टली | Sep 29, 2020 11:39 PM IST
A+
A-
29 Sep, 23:32 (IST)

IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी विजय झाला आहे.

29 Sep, 22:46 (IST)

यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीच्या आरोपाखाली चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून दोन लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

29 Sep, 22:11 (IST)

मुंबईमध्ये मास्क न घातलेल्या लोकांना सार्वजनिक परिवहन बसेस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे बीएमसीने सांगितले आहे.

 

29 Sep, 21:32 (IST)

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत व त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळत आहे.

29 Sep, 21:22 (IST)

कर्नाटकः मंगळूरू पोलिस आणि शहर गुन्हे शाखेने मंगळुरूच्या कार स्ट्रीटवर क्रिकेट सट्टेबाजीच्या आरोपात 11 जणांना अटक केली आहे. मंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांच्याकडून 11 मोबाइल व 15,000 रुपये जप्त केले आहेत.

29 Sep, 20:58 (IST)

मुंबईमध्ये आज 1,713 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 49 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या शहरात 26,001 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरात 8,880 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

29 Sep, 20:54 (IST)

आंध्र प्रदेशात संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक गावे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

29 Sep, 20:49 (IST)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी आता वेगळं वळण घेत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

29 Sep, 20:41 (IST)

गुजरातमध्ये आज 1,381 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1,36,004 इतकी झाली आहे.

29 Sep, 20:14 (IST)

महाराष्ट्रात आज 14,976 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 430 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 19,212 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Load More

गुजरात मध्ये काल रात्री बडोदे मध्ये रात्री बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि पोलिस खात्याचे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रात काल मध्यरात्री दक्षिण मुंबईमध्ये आकाशवाणी आमदार निवास भागात निनावी कॉलने खळबळ उडवून दिली आहे. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच आमदार आणि त्यांच्या स्वीय सचिवांसह अनेकांना तात्काळ घराबाहेर काढण्यात आले आहे. सध्या याबाबत अधिक तपास सुरू आहे.

पाकिस्तानकडून आज सकाळी LOC जवळ, पुंछ जिल्ह्यातील मनकोट सेक्टर मध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. तेथे गोळीबार झाला असून भारतीय जवान देखील त्यांना प्रत्युत्तर देत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

भारतामध्ये आता कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यामधून बरे होणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. आज आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 82% हून अधिक रूग्ण ठीक झाले आहेत.


Show Full Article Share Now