Lockdown: राज्यात 5 लाख 52 हजार 337 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा; 29 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
May 29, 2020 11:36 PM IST
देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. कोरोनामुळे उद्भवलेली गंभीर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या दोन दिवसांत संपेल. त्यानंतर काय होणार हा प्रश्न नागरिकांच्या मनात असला तरी त्याला अद्याप उत्तर मिळालेले नाही. परंतु, अमित शहा यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लॉकडाऊन 5 ची रुपरेषा कशी असावी याच्या सूचना मागितल्या आहेत. त्यामुळे 1 जूननंतरची परिस्थिती लवकरच आपल्यासमोर स्पष्ट होईल.
देशव्यापी लॉकडाऊनमुळे उद्भवलेले अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. श्रमिक ट्रेन्समधून मजूरांना इच्छित स्थळी पाठवण्यात येत आहे. तसंच काही उद्योगधंदे सशर्त परवानगीवर सुरु करण्यात आले आहे. दरम्यान देशावर टोळधाडीचे संकट ओढावले आहे. टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासाठी जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात काही ठिकाणी पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. नाशिक मधील गाववाडी गावात 10 किमी चालत जावून पाणी आणावे लागत आहे. दरम्यान उन्हाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्राला हवामान विभागाने दिलासा दिला आहे. येत्या 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.