पुणेकरांनी एनआरसीचा धसका घेतला असून नागरिकत्व पुरावे मिळवण्यासाठी पळापळ सुरु झाली आहे. 

सांगलीत पगार न दिल्याचा कारणातून उद्योजकावर गोळीबार करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. 

 गोव्यात रासायनिक प्रक्रिया करुन फळ विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत घेण्यात येणार असल्याने नागरिकांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा अशी सुचना रेल्वेकडून देण्यात आली आहे.  

कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात जबरदस्त घसरण झाली असून त्याचा फटका गुंतवणूकदारांना झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवण्याकडे वळत असल्याने पाकिस्तानात 1 तोळे सोन्याचे दर 95 हजारांवर पोहचले आहेत. 

निफाड येथे 15 दिवसात दुसऱ्या बिबट्या जेरबंद करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात हिंगणघाट इथे एका प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्यात आलं होतं. हैदराबादमध्ये आज अशाचं स्वरुपाची घटना घडली आहे. प्रेमाला नकार दिला म्हणून चिडून एका नराधमाने 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित मुलगी 50 टक्के भाजली आहे.


 

प्रसिद्ध कवी-कथाकार प्राचार्य भगवानराव देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. 

Load More

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू होणार होता मात्र मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ उशिरा मिळणार आहे.या संदर्भात काही शासकीय निर्णय आज पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही मुंबई महापालिकेची पुढील सर्वसाधारण सभा 5 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळं पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यास विलंब होऊ शकतो. अशातच काल महाविकाआघाडी सरकारने घेतलेला घेतलेल्या या निर्णयास उच्च न्यायालयात  आव्हान दिले आहे. मनोज गाडेकर यांनी ही याचिका दाखल केली असुन केवळ काही नोकरदारांसाठीच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा  मनोज यांचा आरोप आहे. येत्या 2 मार्च ला दिवशी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे दिल्ली हिंसाचाऱ्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत सुद्धा 9 मार्च पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, दिल्ली मध्ये आता परिस्थिती स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर असली तरी काही ठिकाणी अजूनही तीव्र स्वरूपात हिंसाचार सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल 42 जणांनी आपला प्राम गमावला आहे यामध्ये एका 60 वर्षीय वृद्धाचा देखेल काल मृत्यू झाल्याचे समजतेय.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारावर अजूनही मंदीचे सावट कायम आहे, चीन मध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार आणि त्यातून इतर देशात पोहचलेला संसर्ग हा मंदीचे मुख्य कारण म्ह्णून समोर येत आहे.