Coronavirus (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, भारतात (India) कोरोना बाधित (COVID-19) रुग्णांच्या संख्ये दिवसागणिक वाढ होत आहे. मागील 24 तासांत देशांत 28,637 नवे रुग्ण आढळले असून 551 रुग्ण दगावले आहेत. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 8,49,553 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 22,674 वर पोहोचला आहे. भारतात काल (11 जुलै) दिवसभरात 19,235 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. आतापर्यंत 5,34,621 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

सद्य घडीला भारतात 2,92,258 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तर सिक्कीम आणि अंदमान-निकोबारमध्ये सर्वात कमी 151 आणि 163 अनुक्रमे कोरोना रुग्ण आढळले आहेत. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणून घ्या एका क्लिक वर (List Inside)

देशात काल (11 जुलै) दिवसभरात तब्बल 5 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांसदर्भातील रिकव्हरी रेट 62.78 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.