हिंदूराव रुग्णालयातील वार्ड बॉयचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

 

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन रजेवर असल्याने मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या स्वत:च्या कर्तव्यांव्यतिरिक्त त्यांची नेमणूकही केली: राष्ट्रपती भवन

नव्या भाडेकरूचा भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये सामान हलविण्यावर बंदी आणि सोसायटीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र मागितल्याबद्दल पुण्यातील एका गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

211 ताज्या घटनांमध्ये वाढ होऊन अहमदाबादची कोविड-19 संख्या 20,480 पर्यंत वाढली असून मृतांचा आकडा 13 ने वाढून 1,423 वर पोहचला, अधिकाऱ्यांनी दिली माहिती.

हरियाणा येथे आणखी 402 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 13829 वर पोहचला आहे.

गोव्यात आणखी 70 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1198 वर पोहचला आहे.

आसाम मधील गुवाहाटी येथेआज संध्याकाळी 7 वाजल्यापासून  14 दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

जम्मू-कश्मीर येथे आणखी 127 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 7093 वर पोहचला आहे.

महाराष्ट्रात आणखी 5493 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 156 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 1,64,626 वर पोहचला आहे.

कर्नाटक येथे आणखी 1267 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 13190 वर पोहचला आहे.

Load More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात या रेडिओ प्रोग्रॅममधून जनतेशी संवाद साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रमाचा आज 66 वा एपिसोड पार पडणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यांनी देश अनलॉक व्हायला सुरुवात झाली. अनलॉक 1.0 सुरु झाल्यानंतरचा मन की बात चा हा पहिला एपिसोड आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार, याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.

7 जून पासून सातत्याने वाढत असणारे पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिरावले आहेत. आज दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. दिल्लीत आज पेट्रोल 80.38 रु. प्रति लीटर आणि डिझेल 80.40 रु. प्रति लीटरने मिळत आहे. इंधनाचे दर स्थिरावल्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान कोरोना व्हायरसचे जागतिक आरोग्य संकट जगासह देशात कायम आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा 5 लाखांच्या पार गेला असून त्यात दिवसागणित मोठी भर पडत आहे. अमेरिकेत कोविड-19 चा उद्रेक पाहायला मिळत आहे. अमेरिकेत 25,00,419 कोरोना बाधित रुग्णांसह 1,25,000 रुग्णांचा बळी गेल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या हवाल्याने AFP न्यूज एजेंन्सीने दिली आहे.