Live
                                                    केंद्राकडून आर्थिक वर्ष 2019-20 साठी वार्षिक GST भरण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ  ; 28 फेब्रुवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
                            
                                
                                    
                                        बातम्या
                                    
                                    
                                        Bhakti Aghav
                                        |
                                    
                                    Feb 28, 2021 11:57 PM IST
                                 
                                
                             
                         
                
                                                महाराष्ट्रात फेब्रवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात 8 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. शनिवारी राज्यात 8 हजार 623 नव्या करोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले. तसेच, 51 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्या ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' करतील. आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रमातून ते देशवासियांना संबोधित करणार आहेत. हा त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाचा 74 वा भाग आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या महिन्याच्या सुरुवातीला लोकांना 'मन की बात'साठी वेगवेगळ्या विषयांवरील कल्पना आणि सूचना विचारल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडू शकतात.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, 1 मार्चपासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष कोणता मुद्दा उचलून धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेना नेते संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावेळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.