Corona Update In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात एका दिवसात 729 नवे रुग्ण आढळले तर, 31 लोकांचा मत्यू; 28 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Apr 28, 2020 11:27 PM IST
महाराष्ट्रामध्ये एकीकाडे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे उभं ठाकलेले आर्थिक संकट महाराष्ट्रावरही घोंघावत आहे. देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्याने महसूलामध्ये मोठी घट झाली आहे. त्यावर आता मोदी सरकारने काटकसर सुरू केल्याने या आर्थिक उपाययोजनांवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेचे कठोर उपाय म्हणजे सामान्यांच्या खिशाला कात्री लावणं असेल तर मग देशाला अर्थमंत्र्यांची गरजच काय? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. काल मागील चोवीस तासात भारतामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. काल भारतात एकूण 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, देशभरातील रुग्णांची संख्या आता 29 हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान सध्या देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आता या लॉकडाऊनचं पुढे काय होणार? याकडेच देशातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत सतत चढ-उतार पहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यातील दाटीवाटीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळत असल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.