आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन निलंबित ; 27 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Prashant Joshi
|
Feb 27, 2020 11:23 PM IST
मराठी भाषा... भारतातील 22 प्रमुख भाषांमधील एक. ज्या भाषेने महाराष्ट्राची संस्कृती, कला, इतिहास, साहित्य जगभरात पोहचवले, अशा मराठी भाषेचा आज गौरव करण्याचा दिन. मराठी भाषा दिवस किंवा मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी जगभरातील मराठी भाषकांकडून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. 1987 साली कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला.
आज महाराष्ट्रासह जगभरातील मराठी लोक हा दिवस साजरा करत आहेत. या दिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्लीच्या ईशान्य भागात गेले चार दिवस सीएएविरोधी हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये डझनभर वाहने आणि अनेक घरे पेटवण्यात आली आहेत. बुधवारपर्यंत यामध्ये एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 लोक जखमी आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
कोरोना व्हायरसने घातलेले थैमान अजून थांबण्याचे नाव घेत नाही. याचे लोण जगातील अनेक देशांत पसरले आहे. इटली नंतर आता स्पेनमध्येही या विषाणूने शिरकाव केला आहे. इटलीमधील एक पर्यटक कोरोना विषाणूच्या संशयास्पद प्रकरणात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, शेकडो लोक टेनिरिफमधील हॉटेलमध्ये अडकले आहेत व आता त्यांच्या बाहेर जाण्यास बंदी घातली. त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे, जपानच्या जहाजावर अडकलेले 119 भारतीय दिल्लीत परत आले आहेत.