कोरोनावरील लस Covaxin च्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला AIIMS मध्ये सुरुवात ; 26 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Nov 26, 2020 11:49 PM IST
आज कार्तिकी एकादशी. त्यानिमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. यावेळी कवडुजी भोयर आणि कुसुमबाई भोयर हे दांपत्य मानाचे वारकरी ठरले. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे कोरोना विषाणुवरील लस लवकर येऊ दे आणि जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठूरायाचरणी घातले आहे.
26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणूनही साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेले संविधान भारताने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. म्हणून हा दिवस संविधान दिवस साजरा करण्याची प्रथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 पासून सुरु केली.
आज 26/11. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना सलाम करुया.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम असून दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच प्रशासनही सज्ज झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी सरकारने नवनवे नियम लागू केले आहेत.