Coronavirus (Photo Credits: Twitter)

Coronavirus Update In India: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंंब मंंत्रालयाने दिलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार, कालच्या दिवसभरात कोरोना रुग्णांंच्या संंख्येत 67,151 नव्या रुग्णांंची भर पडली आहे, यानुसार देशातील कोरोना रुग्णांचा आकडा (Coronavirus Total Cases) 32 लाखाच्या पार गेला आहे. सध्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 32,34,475 वर पोहचली आहे. मागील 24 तासात 1,059 जणांंचा मृत्यु झाला असुन आजवरच्या एकुण मृतांंची (COVID 19 Deaths) संंख्या 59,449 इतकी झाली आहे. सविस्तर आकडेवारी पाहिल्यास, सध्या देशात कोरोनाचे 7,07,267 अ‍ॅक्टिव्ह (Coronavirus Active Cases) रुग्ण आहेत तर आजवर 24,67,759 जणांंनी कोरोनावर मात (COVID 19 Recovered Cases) केली आहे. या आकड्यांची सरासरी पाहिल्यास कोरोनावर मात करुन बरे झालेल्या रुग्णांंची संंख्या ही अ‍ॅक्टिव्ह रुग्णांंच्या तुलनेत फार पुढे आहे त्यामुळे देशभरात अजुनही परिस्थिती नियंत्रणात आहे असे म्हणता येईल.

Coronavirus Worldwide Update: जगभरात कोरोनाचे 2.38 कोटी रुग्ण, आजवरची रिकव्हर, मृत आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची सविस्तर आकडेवारी पाहा

देशात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासुनच मोठ्या स्तरावर चाचण्या घेण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. वेळीच कोरोना चाचण्या केल्याने रुग्ण गंंभीर परिस्थीतीत पोहचण्याच्या आधीच त्यांंच्यावर उपचार करुन विषाणुला पसरण्यापासुन थांंबवता येत आहे. आयसीएमआर च्या माहितीनुसार देशात 25 ऑगस्ट पर्यंत एकूण 3,76,51,512 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत, यातील 8,23,992 स्वॅब नमुने हे कालच्या दिवसभरात घेण्यात आले आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, रशिया द्वारा विकसित करण्यात आलेली कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरस वरील लस स्पूटनिक व्ही (Sputnik V Vaccine) संदर्भात भारतासोबत चर्चा सुरु आहे. या लसीला सकारत्मक प्रतिसाद मिळाल्यास कोरोना संंपण्यासाठी एक आशेचा किरण दिसुन येत आहे.