रशिया (Russia) द्वारा विकसित करण्यात आलेली कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रक लस स्पुतनिक व्ही (Sputnik V Vaccine) संदर्भात भारतची चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारने (Central Government माहिती देताना मंगळवारी (25 ऑगस्ट) सांगितले की, रशिया आणि भारत (India) यांच्यात प्राथमिक चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना काही प्राथमिक माहिती सादर केली आहे.
Sputnik V Vaccine गॅमेलिया रिसर्च इन्स्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अॅण्ड मायक्रोबायोलॉजी ने रशियन डायरेक्टर इन्वेस्टमेंट फंड (RDIF) सोबत मिळून तयार केली आहे. ही लस 11 ऑगस्ट रोजी नोंदणीकृत करणयात आली होती. लसीबाबत एकमेकांना सहकार्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये (रशिया आणि भारत) यांच्यात चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, COVID-19 Vaccine Update: रशिया मध्ये कोरोना व्हायरस वरील 'Sputnik V' लसीच्या पहिल्या बॅचचे उत्पादन)
एका पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, स्पुतनिक व्ही वॅक्सीन संदर्भात भारत आणि रशिया दोन्ही देश परस्परांना विश्वासात घेत आहेत. दोन्ही देशांनी प्राथमिक माहिती एकमेकांना हस्तांतरीत केली आहे. आता काही विस्तारीत माहितीची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, आरडीआयएफचे सीईओ किरिल दिमित्रीव यांनी म्हटले आहे की, रशियाने विकसित केलेली कोविड 19 लस उत्पादनासाठी भारत भागिदारी करु इच्छितो. दरम्यान, भारतामध्ये तीन लसी परिक्षणासाठी प्रक्रियाधीन आहेत.