Coronavirus Worldwide Update: जगभरात कोरोनाचे 2.38 कोटी रुग्ण, आजवरची रिकव्हर, मृत आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची सविस्तर आकडेवारी पाहा
Coronavirus | ( Photo Credit: Pixabay.com )

Coronavirus In World: जगभरातील कोरोना रुग्णांंची संख्या आता 2 कोटी 38 लाखाच्या वर पोहचली आहे. आजवर दुर्दैवाने यातील तब्बल 8 लाख 17हजार 025 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु (Coronavirus Fatality) झाला आहे. अलिकडेच जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या (Johns Hopkins University) माध्यमातुन देण्यात आलेल्या माहितीनुसार,मंंगळवार, 25 ऑगस्ट च्या सकाळपर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांचा एकुण आकडा (COVID 19 Cases Worldwide) 2,38,12,853 इतका झाला आहे, यातील 1,63,63,830 रुग्णांनी आजवर कोरोनावर मात (Coronavirus Recovery) केली आहे तर सध्या जगात कोरोनाचे एकुण 66,31,998 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (COVID 19 Active Cases)  आहेत. आपण या संपुर्ण आकडेवारीनुसार कोरोना रिकव्हरी रेट आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंंख्येची तुलना केल्यास जगभरात परिस्थिती नियंत्रणात आहे असे दिसुन येतेय. तसेच अनेक देशात मृत्यु दर घटत असल्याने दिलासादायक परिस्थिती आहे.

कोरोना व्हायरसचे संकट कधी संपणार? WHO च्या प्रमुखांनी दिले 'हे' उत्तर

कोरोना व्हायरस च्या Worldometer च्या नुसार, अजुनही कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णसंख्येसह अमेरिका टॉपवर आहे, आजवर युएस मध्ये कोरोनाचे 57,39,068 रुग्ण आढळले असुन यातील 1,77,248 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या ब्राझील मध्ये आजवर कोरोनाचे 36, 22,861 रुग्ण आढळले आहेत व यातील 1,15,309 जणांंचा मृत्यु झाला आहे. या यादीत भारत सध्या तिसर्‍या स्थानी असुन भारतात कोरोनाचे एकुण 31,06,348 रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, भारताच्या नंंतर कोरोना रुग्णांंच्या आकडेवारीनुसार जगातील देशांंच्या यादीत रशिया (9,59,016 रुग्ण), दक्षिण आफ्रिका (6,11,450 रुग्ण), पेरु (5,94,326 रुग्ण),मेक्सिको (5,63,705 रुग्ण), कोलंबिया (5,41,139 रुग्ण), स्पेन (4,05,436), चिली (3,99,568 रुग्ण) अशा दहा देशांचा समावेश आहे.

दुसरीकडे, कोविड-19 (COVID-19) वर लस (Coronavirus Vaccine) उपलब्ध न झाल्याने कोरोनाचे संकट कधी संपणार असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनने (World Health Organization) 2 वर्षात कोरोना व्हायरसचे संकट संपेल, अशी आशा असल्याचे म्हटले आहे.