लेफ्टिनेंट जनरल (सेवानिवृत्त) डी एस हुड्डा (Photo Credit- File Photo/ANI)

उरी हल्लानंतर भारतीय जवानांनी (Indian Army) केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या (Surgical Strike) यशाबद्दल आनंद नक्कीच आहे. पण त्याचा अतिरेक करु नका. सर्जिकल स्ट्राईक करणे गरजेचे होते पण त्यावरुन राजकरण करुन त्याचा प्रचार करण्यात आल्याचे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी.एस.हुड्डा (General Retired D S Hooda) यांनी म्हटले आहे.

सर्जिकल स्ट्राईकचा देशभरात जास्त प्रचार केला जात आहे आणि पंतप्रधान मोदींसमवेत इतर सर्व मंत्री याचे श्रेय घेत आहेत.

न्युज एजेंसी ANI ला दिलेल्या मुलाखतीत जनरल हुड्डा यांनी सांगितले की, भारतीय सेना अनेक ऑपरेशन्स करत असते. मात्र सैन्याच्या अभियानाचा फायदा राजनैतिक दृष्टीने घेतला जातो. जे देश आणि सेनेसाठी योग्य नाही.

पुढे ते म्हणाले की, राजनैतिक आणि सैन्याच्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवणे अधिक योग्य ठरेल. त्याचबरोबर सेनेचे सर्व ऑपरेशन्स सार्वजनिक करण्याचीही गरज नाही. मात्र या ऑपरेशनची परिस्थितीच अशी होती की ते सार्वजनिक करावे लागले. सर्जिकल स्ट्राईकवर केंद्र सरकारचे काय म्हणणे होते या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, सेनेचे अभियान चालवणे हे जवानांचे काम आहे. पण पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्याशिवाय अभियान पुढे चालू शकत नाही.