Dead | (Photo credit: archived, edited, representative image)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील झांशी येथे एका 36 वर्षीय प्रियांश सोनी हिने आत्महत्या केली आहे. मासिक पाळी (Menstruation) आल्याने चैत्र नवरात्र 2025 (Chaitra Navratri 2025) दरम्यान पूजा करता येऊ शकत नसल्याने नैराश्येत येऊन या महिलेने कथीतरित्या आत्महत्या (Case) केली आहे. आत्महत्या केलेली प्रियाशा ही महिला दोन महिलांची आई आहे. तिच्या पश्चात पती, दोन लहान मुली, 3 वर्षांची जान्हवी आणि 2 वर्षांची मानवी आहेत. केवळ मासिक पाळी पूजेआड येत असल्याने त्यात सहभागी होता येत नाही, या कारणावरुन तिने विष प्राषण केल्याचे समजते. दरम्यान, मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, भारती संस्कृतीमध्ये विविध प्रदेशांमध्ये त्याकडे वेगवेगळ्या दृष्टीकोणातून पाहिले जाते.

मानसिक नैराश्य

प्रियांशा ही नवरात्र सणाची वर्षभर प्रतिक्षा करत होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चैत्र नवरात्र 2025 हा उत्सव साजरा करण्यासाठी ती प्रदीर्घ काळापासून तयारी करत होती. त्यातूनच तीने 29 मार्च रोजी, तिने तिचे पती मुकेश सोनी यांना पूजासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू - फुले, फळे, मिठाई, दिवे आणि धान्य - गोळा करण्यास सांगितले. दरम्यान, 30 मार्च रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, तिला मासिक पाळी सुरू झाली. त्यामुळे तिने मनात आखलेल्या अनेक योजना भंग पावल्या. त्यातून तिने नैराश्येत जात शेवटचे पाऊल उचलले. (हेही वाचा, Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीमध्ये कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त कधी आहे? जाणून घ्या)

मासिक पाळी एक नैसर्गिक प्रक्रिया

अनेक पारंपारिक घरांमध्ये, मासिक पाळी 'अपवित्र' मानली जात असल्याने, महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात प्रार्थना किंवा उपवास करण्यास परावृत्त केले जाते. मात्र, मासिक पाळी ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामध्ये चांगले किंवा वाईट असे काही नसते. असे असले तरी, या काळात आता उपवास किंवा पूजा करू शकत नाही, असा विचार मनात आणून प्रियांशा नामक सदर महिला अत्यंत निराश झाली. तिचा पती मुकेश यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले की, मी तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, मासिक पाळी हा जीवनाचा एक सामान्य भाग आहे आणि दर महिन्याला होतो हे स्पष्ट केले. मी तिच्यासाठी विधी करण्याची देखील तयारी दर्शवली, पण ती तिचे दुःख दूर करू शकली नाही. अखेर तिने हे पाऊल उचलले. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Student Dies by Suicide in Matunga:माटूंगा येथील जय हिंद कॉलेजमधील विद्यार्थिनीची आत्महत्या, 14 मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी; मुंबई पोलिसांकडून तपास सुरु)

परिस्थिती बिकट झाली

अधिक माहिती अशी की, मुकेश कामावर गेल्यानंतर, प्रियांशा रडत रडत होती, ज्यामुळे तो तिला आधार देण्यासाठी घरी परतला. त्याच्या प्रयत्नांना न जुमानता, तो पुन्हा बाहेर पडल्यानंतर तिने लगेचच विष प्राशन केले. तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिने पश्चात्ताप व्यक्त केला आणि तिच्या पतीला सांगितले, 'माझी चूक झाली आहे.' दरम्यान, तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तिच्या मनाला आणि शरीराला आराम मिळावा म्हणून तिच्या पालकांच्या घरी नेण्यात आले, प्रियांशाची प्रकृती आणखी बिकट झाली. उलट्या आणि पाठदुखीची तक्रार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तिला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, ज्याचे कारण तिच्या पतीने सुरुवातीला मासिक पाळी असल्याचे सांगितले.

सुरुवातीला सर्व काही नियंत्रणात असल्याचे वाटत होते. पण दुसऱ्या दिवशी दुपारी, तिने मला आमच्यासाठी काही ज्यूस आणण्याचा आग्रह धरला. मला तिची साथ सोडायची नव्हती, पण तिने मला आग्रही केला. मी परत आलो तेव्हा ती ऑक्सिजन सपोर्टवर होती. पुढे 15-20 मिनिटांतच ती निघून गेली, असे पती मुकेश यांने सांगितले.