
Beed Latest Crime News: ऐकावे ते नवलच अशी घटना घडली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांचा मोबाईल चक्क गायब (Yogesh Kadam's Mobile Phone Missing) झाला आहे. बीड (Beed) दौऱ्यावर असताना ही घटना घडली. हा मोबाईल नेमका हरवला की चोरीस गेला याबाबत अद्यापही संभ्रम आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी कदम यांनीही घडल्या प्रकारास दुजोरा दिला आहे. मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. विशेष म्हणजे चक्क प्रसारमाध्यमांचे कॅमेरे, पोलिसांची चोख सुरक्षा असतानाही गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल गायब झाला आहे. त्यामुळे राज्यभर नवल व्यक्त केले जाऊ लागले आहे. अनेकांनी तर आक्रीत घडलं अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पोलिसांची सुरक्षा असतानाही मोबाईल गायब
योगेश कदम हे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. गृहराज्यमंत्रालयाच्या अंतर्गत राज्याचे संपूर्ण पोलीस दल आणि कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा येते. असे असताना जेव्हा गृहराज्यमंत्री एखाद्या ठिकाणी येतात तेव्हा सुरक्षाही तितकीच चोख ठेवली जाते. असे असताना जर अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचा मोबाईल गायब होत असेल तर राज्याची सुरक्षा कोणत्या पातळीवर राखली जात असेल असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, सरकार कायदा व सुव्यवस्थेची वल्गना करते पण इथे गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईलच पोलिसांच्या सुरक्षेत असताना गायब होत असेल तर इतरांची अवस्था काय? अशी खिल्ली विरोधक उडवत आहेत. (हेही वाचा, Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा ला कुणी पैसे दिलेत का? तपासणार; MoS Home, Yogesh Kadam यांची माहिती)
विरोधकांकडून टीका
दरम्यान, योगेश कदम यांचा मोबाईल गायब होण्याची सोशल मीडियावरही जोदार चर्चा आहे. हा मोबाईल नेमका हलवला की, चोरीस गेला याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांची सुरक्षा असतानाही मोबाईल चोरीस जातोच कसा, अशी भावना कदम यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरुन प्रशासन आणि सरकारला धारेवर धरले आहे.
दरम्यान, योगेश कदम यांचा मोबाईल हरवणे म्हणजे दिवख्याली अंदाज असल्याची भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. जर राज्याच्या मंत्र्याची सुरक्षा निट होत नसेल तर सामान्य नागरिकांनी जायचे कोठे. जर मोबाईल टॉवरखालीच नेटवर्क नसेल तर तो किती मोठा उपहास ठरु शकेल, असा उपहास गृहमंत्र्यांचा मोबाईल गायब झाल्याने झाल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर अधिकृत गुन्हा दाखल झाला आहे किंवा नाही याबाबत माहित मिळू शकली नाही.