गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानपरिषदेमध्ये कुणाल कामराला कुणी पैसे दिले होते का? याचा देखील तपास केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान एका स्टॅन्डअप कॉमेडी शो दरम्यान एकनाथ शिंदे यांचे थेट नाव न घेता गायलेल्या गाण्यावरून शिवसैनिकांनी काल मुंबईत एका स्टुडिओ ची तोडफोड केली आहे. आज विधिमंडळातही त्याची चर्चा झाली. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुणाल कामरा चे कॉल सीडीआर तपासले जातील तसेच बॅंक अकाऊंट्स देखील तपासले जाणार असल्याचं म्हटलं आहे. 'संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य  दिले आहे पण , ते संवैधानिक पदांवर असलेल्यांचा अपमान करण्याचा अधिकार देत नाही.' अशी प्रतिक्रियाही योगेश कदम यांनी दिली आहे. नक्की वाचा:  Kunal Kamra ‘Gaddar’ Remark Row: कॉमेडियन कुणाल कामरा फक्त 'या' अटीवर माफी मागण्यास तयार - रिपोर्ट्स .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)