Shahaji Bapu Patil | (Photo Credit - Youtube)

सांगोला (Sangola) येथील शिवसेना पक्षाचे (Shiv Sena) माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. प्रसारमाध्यांमध्ये चर्चेत कसे राहायचे, लोकांमध्ये आपले आकर्षण कसे निर्माण करायचे, याबाबत या गृहस्थांचा हातकंडा. आताही ते चर्चेत आहेत. कोणत्या वक्तव्याने नव्हे, तर आपल्या कृतीने. त्यांनी स्वत:च आपल्या आताने आपल्या थोबाडीत (Slapped Himself) मारुन घेतले आहे. त्यांच्या या कृतीचीही प्रसारमाध्यामातून चांगलीच चर्चा होत आहे. काय ते डंगार.. काय ती झाडी.. सगळं कसं एकदम ओके, असं म्हणता म्हणता भर सभेत, जाहीर व्यासपीठावरुन त्यांनी स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच थोबाडीत का मारुन घ्यावी? असा सवाल जर तुम्हाला पडला असेल तर, त्याचे कारण जरुन जाणून घ्या.

काय झाडी.. काय डोंगर.. काय हाटेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेना आमदारांनी सूरत मार्गे गुवाहाटी गाठली होती. त्या आमदारांमध्ये त्यामध्ये सांगोलाचे शहाजी बापू पाटील यांचाही समावेश होता. गुवाहाटी येथीलच एका हॉटेलमधून आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी 'काय झाडी.. काय डोंगर.. काय हाटेल..एकदम ओके', असे उद्गार काढले आणि आजच्या डिजिटल युगात ते प्रचंड व्हायरलसुद्धा झाले. त्या वेळी ते त्यांच्या प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर आले होते. त्यांना निवडणूक प्रचारामध्येही जोरादर मागणी होती. पण, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांचा दणकून पराभव झाला. त्यामुळे ते काहीसे माध्यमांच्या नजरेतून बाजूला फेकले गेले. दरम्यान, आता ते स्वत:च्याच थोबाडीत मारुन घेण्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. नेमके काय घडले असेल? (हेही वाचा, Shahajibapu Patil: डोंगर..झाडी फेम आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले, आमदार निवासातील खोलीचे छत कोसळले)

स्टेजवर नेमकं काय घडलं?

पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात शहाजीबापू उद्विग्न

त्याचं झालं असं की, लोकसभा निवडणुकीत भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर यांचा दणदणीत पराभव झाला. शिवसेना भाजप युती असल्याने निंबाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी शहाजीबापू यांच्यावरही होती. नेमकी त्यांच्या सांगोला मतदारसंघातच निंबाळकर यांना कमी मते मिळाली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना आघाडी मिळाली. त्याची सल त्यांच्या मनात अनेक महिन्यांपासून होती. दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जाहीर व्यासपीठावरुन बोलताना त्यांनी भाजप उमेदवार निंबाळकर यांचा लोकसभेला पराभव झाला. याबद्दल मनातील सल बोलून दाखवली. त्याच वेळी त्यांनी आपल्याच हाताने आपल्याच थोबाडीत मारुन घेतली. उल्लेखनीय असे की, विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला तर आपण फाशी घेऊ, असेही विधान त्यांनी केले होते. त्यामुळे आताचे त्यांचे स्वत:च स्वत:ला थोबडवणे उद्विग्नतेतून आले आहे की, केवळ पब्लिसीटी स्टंट याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.