Delhi Beat Chennai, IPL 2025 17th Match Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने साधली विजयाची हॅटट्रिक, चेन्नईचा सलग तिसरा पराभव; 15 वर्षांनंतर चेपॉकवर विजय

या रोमांचक सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 25 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी दिल्ली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा करु शकला.

Delhi Beat Chennai, IPL 2025 17th Match Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने साधली विजयाची हॅटट्रिक, चेन्नईचा सलग तिसरा पराभव; 15 वर्षांनंतर चेपॉकवर विजय
DC (Photo Credit - X)

Chennai Super Kings vs Delhi Capitals IPL 2025 17th Match Scorecard:  इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 25 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, दिल्ली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा करु शकला.

केएल राहुलची 77 धावांची शानदार खेळी

दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत सहा विकेट गमावून 183 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून स्टार यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलने 77 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, केएल राहुलने 51 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. केएल राहुल व्यतिरिक्त इतरांनी धावा केल्या. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जकडून खलील अहमदने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. खलील अहमद व्यतिरिक्त मथिशा पाथिराना, रवींद्र जडेजा आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे देखील वाचा: KL Rahul Milestone: केएल राहुलने केली मोठी कामगिरी, रोहित-कोहलीच्या खास क्लबमध्ये सामील

दिल्लीपुढे चेन्नईची शरणागती

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकांत पाच विकेट गमावून फक्त 158 धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार अष्टपैलू विजय शंकरने सर्वाधिक 69 धावांची नाबाद खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान विजय शंकरने 54 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारला. विजय शंकर व्यतिरिक्त, एमएस धोनीने नाबाद 30 धावा केल्या. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सकडून विप्राज निगमने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. विप्रज निगम व्यतिरिक्त मिचेल स्टार्क, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).