दिल्लीत आज एका दिवसात 3,630 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 56746 वर; 18 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Jun 20, 2020 11:44 PM IST
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहेच. पण त्यानंतर आता भारत-चीन सीमारेषेवरील परिस्थिती तणावाची असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळेच शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी गलवानच्या खोऱ्यात शहीद झालेल्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यात आली. भारताचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही असे मोदी यांनी म्हटले.
देशात सलग 14 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 77.88 प्रति लीटर (0.51 ची वाढ) तर डिझेलचे दर 77.67 प्रति लीटर (0.61 ने वाढ) झाली असून या किंमती दिल्लीसाठी आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 9 जून पासून राष्ट्रीय राजधानीत अनुक्रमे 5.88 रुपये प्रति लीटर आणि 6.50 प्रति लीटर झाल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, उद्या जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. मात्र यंदाचे देशावरील कोरोनाचे संकट पाहता तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार नाही आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाचा देशातील आकडेवारी पाहिल्यास रुग्णांचा आकडा 380532 वर पोहचला असून 12573 जणांचा बळी गेला आहे. तसेच 163248 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 204711 जणांची प्रकृती सुधारली आहे.