महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतेय; महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; 20 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Apr 20, 2020 11:14 PM IST
भारताचा कोरोना विरोधातील लढा तीव्र असून त्या पार्श्वभूमीवर 3 मे देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. मात्र यामुळे भारताचे अर्थव्यवस्था कोलमडू नये यासाठी 20 एप्रिलपासून केंद्रीय सरकारने एक नवीन नियमावली काढली आहे. त्यानुसार, काही उद्योगधंदे, ऑफिसेस आजपासून सुरु करण्यात येणार आहे. याचाच अर्थ आजपासून काही अंशी लोक घराबाहेर पडतील. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आजपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भातील मुंबईतील वाशी टोलनाक्यावरील काही फोटोज आज ANI वृत्तसंस्थेने दाखविली आहेत.
महाराष्ट्रात आज 552 नवीन कोरोना व्हायरस केसेस आणि 12 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह एकूण सकारात्मक घटनांची संख्या 4200 वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 223 मृत्यूची नोंद झाली असून, 507 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. भारतात परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची, संख्या 16,116 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे 519 लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि सध्या एकूण 13,295 लोक या साथीच्या आजाराशी झुंजत आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 1324 नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत, तर 31 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर जगभरातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीविषयी बोलायचे झाले तर, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,997 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती AFP न्यूज एजन्सी ने दिली आहे. जगभरात एकूण 24,06,910 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 1,65,059 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.