दिल्ली: हाथरस आणि फार्म बिलावरुन अखिल भारतीय किसान काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे काही जणांवर कोरोनासंबंधित नियम आणि कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ; 2 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Oct 02, 2020 11:18 PM IST
भारतामध्ये आज (2 ऑक्टोबर) महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्लीमध्ये राजघाट येथील स्मृतिस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान मोदींनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली आदरांजली अर्पण करताना, भारताला अधिक समृद्ध करण्यासाठी गांधीजींचे विचार प्रेरणा देतील.अशा आशयाचे ट्वीट करण्यात आले आहे.
पंतप्रधानांपाठोपाठ देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील राजघाटावर आले होते. भारतामध्ये आज महात्मा गांधीजी यांच्यासोबतच लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती साजरी केली जात आहे.
दरम्यान देशामध्ये हाथरस येथील बलात्काराच्या घटनेनंतर त्याचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये पहायला मिळत आहेत. काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी काल पीडितेच्या मुलीची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुकी झाली. त्यावरून देखील कॉंग्रेस नेत्यांनी व अन्य विरोधकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेस नेते निदर्शनं करणार आहेत. आज कृषिविधेयकाचादेखील आंदोलनादरम्यान निषेध करण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटाचा धोका देखील अद्याप कायम आहे.