झारखंड येथे आज आणखी 151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 2 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Jan 02, 2021 11:56 PM IST
ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू (Coronavirus) भारतातदेखील आढळून आला आहे. त्यामुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, अशातचं आज देशभरात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात आज तीन ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरी घेण्यात येणार आहे. यात शहरातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सराव फेरी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, आज शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून विरोध पक्ष भाजपवर सनसणीत टीका करण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीमुळे शहराच्या नामांतराच्या मुद्द्यांने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केल्या. त्यामुळे भाजपाने यावर शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. यावर शिवसेनेने सामनातून भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
शिवसेनेने भूमिका बदललेलीच नसून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीचं जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरचं दुरुस्ती होईल. भाजपाने त्याची काळजी करू नये. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसही मान्य करेल. औरंगजेब हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, अशी खोचक टीकाही शिवसेनेने भाजपवर केली आहे.