मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट; 18 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Jan 18, 2021 11:49 PM IST
महाराष्ट्रामध्ये आज ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाचा धुरळा उडणार आहे.राज्यात काही ठिकाणी बिनविरोध निवडणूका पार पडल्या आहेत. मात्र काही ठिकाणी चुरशीच्या निवडणूका पहायला मिळणार आहेत. राज्यात सत्ता समीकरणं बदलल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने आता ग्रामीण पातळीवर त्याचे काही पडसाद दिसतात का? हे पहावं लागणार आहे. काही ठिकाणी आमदारांच्या गावांमध्ये त्यांच्या राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पहायला मिळाल्या आहेत. पुण्यामध्ये आज विजयी मिरवणूका काढता येणार नाही. फटाके फोडणं, गुलाल उधळणं यावर बंदी आहे.
दरम्यान देशामध्ये शेतकरी आंदोलन कायम आहे. नवे 3 कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. त्यानंतर आता आज सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावर सुनावणी होणार आहे. येत्या 26 जानेवारी म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. दिल्ली मध्ये दुसरीकडे लष्कराकडून रिपब्लिक डे ची तयारी जोरदार सुरू आहे. राजपथावर त्याची रंगीत तालीम सुरू आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तेढ सध्या देशात कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 12 जानेवारीला पुढील आदेशापर्यंत नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन हा तिढा सोडवण्यासाठी शिफारशी करण्याकरिता चार सदस्यांची समितीही नियुक्त केली आहे.